आँsख आँsख आँsख आँsख आँsख ……….
ऑनलाइन मागवलेलं पार्सल घ्यायला गेले तर डिलिव्हरी बॉयची रिंगटोन वाजली………
झालं 🙃
आमच्या मनात पुढचं वाजायला लागलं……ओ लडकी आँख मारे……..दिवसभर मग तेच
लडका आँख मारे ……लडकी आँख मारे 😛
येड लागायची पाळी आली आता…….कित्ती दिवस झाले काही केल्या डोक्यातून, मनातून, तोंडातून हे गाणं जाता जाईना………😇
आणि विसरावं म्हटलं तरी कोणी विसरू देईना…..🙃
सकाळी उठल्यावर वातावरण प्रसन्न करायला भक्तीगीतं सुरू करते …….. माझंही सूर आळवणं सुरू असतं……
विठ्ठला ssssssssss मायबापा
विठुमाऊली तू माऊली जगाची sssss
तेवढ्याssत रस्त्यावरून एखादी गाडी वाजवून जाते 📣दिल धडकाये ….. सिटी बजाये…….
मग आम्ही सुरू…….बीच सडक मे नखरे दिखाये…..सारे
ओ करके इशारे ………ओ लडकी ………😉
भक्तिरस🙏 संपुष्टम् ……….
दुपारी दमून भागून(तिच्या मते) मुलगी शाळेतून आली की फ्रेशनेसचा तडाखा सुरू ………..आँख आँख आँख आँख आँख ……….
सुटका नाहीच…….🙆
काय नाय तर पोरगा पण जेव्हा तेव्हा ओ लडकी sss सारखा ओ मम्मी ssss सूर लावतो……
मग पुन्हा मनात, डोक्यात, तोंडात तिं तिनक तिन्..
तिनक तिंन्.. तिं तिनक तिन् चा ठेका सुरू.
जरा विरंगुळा म्हणून टीव्ही वर गाणी बघावीत म्हटलं तर सहा पैकी चार चॅनल वर
तुषार कपूर की आवाज मे – इ ओ आss… आss… आss… आs आs आs आs आ
कुमार शानु की आवाज में – ओ लडकी आँख मारे
मग नंतर साक्षात हमारी (भसाडी) आवाज मे to be non stop continue………
तसं याचं ओरिजिनल गाणं सुद्धा मला खूप आवडायचं……आणि तो पिक्चरही ‘तेरे मेरे सपने’……फुल्ल टाईमपास…..वारसी भाई भन्नाट आहेत त्यात…….
हे सिम्बावालं गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला पण हेच वाटलं; Ohh god one more remix 🤦
पण मीच कधी त्यावर ठेका धरायला लागले माझं मलाच समजलं नाही आणि आता तर
जहाँ जहाँ जाऊ मेरे पीछे पीछे आये……🎶🎶🎶
घरात – बाहेर जिथे तिथे मला नुसतं सताऊन सोडलंय…… तोंडात नाही तर मनात; दिल धडकाये सुरूच……
आपल्या सैराटच्या वेळी एक तसच झालेलं, शेवटी घश्याने हरताळ पुकारला तेव्हा कुठे ते झिंग झिंग झिंगाट थांबलं……
आता हे खूळ कधी जातंय बघूया, तोपर्यंत घसाफोडी आहेच ……
ही हो हाss… हाsss…. हाsss हाss
हाs हाs हाs हाssss
तुम्हाला झालय का हो असं कधी, सांगितलं तर चालेल बरं 😆
©️स्नेहल अखिला अन्वित