तर मागच्या आठवड्यापासून आमच्या चिंटूकल्याची शाळा सुरू झाली.
आमच्या पोरीने तिच्या शाळेच्या पहिल्या दिवशी (आणि नंतरही बरेच दिवस) वर्गात जाताना चांगलाच धिंगाणा घातला होता.
या बाब्याची इतर सोंगे बघता हा माझा नक्कीच जीव काढणार ह्या बाबतीत मला काही शंकाच नव्हती.
शेवटी तो क्षण आला, बाब्याने शाळेचा ड्रेस चढवला, डब्यातला निम्मा खाऊ घरीच खाऊन घेतला, वॉटरबॅगची टेस्ट घेऊन झाली, दप्तर गळ्यात अडकून फोटोसाठी पोझ देऊन झाली. (या सर्व तयारीत मी धास्तावलेलीच, कधी याचं डोकं फिरेल याचा काही नेम नाही)
Finally राजीखुषीने आमची वरात शाळेत पोचली. तिथला देखावा बघून वाटलं आता मात्र हा नक्कीच गळा काढणार. (मी रुमाल तयारच ठेवला)
बऱ्याच चिमुकल्यांना दुःख अनावर झालेलं, कोणी नुसतं भोकाड पसरून तर कोणी भोकाडासह जमिनीवर लोळून तर कोणी सर्व शक्तीनिशी आई किंवा बाबांना तिथून ओढून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करत होते.
आमच्या बाब्याने सर्व घटनेची नोंद घेतली, पण त्यास दुजोरा काही दिला नाही (कसं काय बुवा 🤔)
आणि विशेष म्हणजे या सर्व राडयाकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून माझा चिंटया वर्गात घुसलासुद्धा 🙃
Ohh My God !!!!
मी तिथल्या तिथं स्वतःला जोरात चिमटा काढला. हे असं होऊ शकतं! डोळ्यातून एक टिपूसही न काढता , माझ्याकडे एकदाही वळून न पाहता, मला सळो की पळो न करता बाब्या चक्क वर्गात जाऊन बसला………….
काहीही म्हणा जीवाला जाम लागलं माझ्या, मी किती दिवसांपासून धास्ती घेतलेली या क्षणाची, आदल्या दिवशी रात्री तर धड झोप पण नाही लागली, कित्ती धडे गिरवून ठेवलेले आपत्कालीन परिस्थितीत काय काय करायचं याचे. पोरगी सुद्धा क्लास बुडवून मला आधार द्यायला आली होती.
सगळ्या सगळ्यावर पाणी फेरलं, अरे काय नाय तर नुसत्या डोळ्याच्या कडा ओलावल्या असत्यास तरी बरं वाटलं असत रे, काय मिळालं तुला अस वागून????
हे असं शोभत का, कोणाकडेही न बघता खाली मान घालून घरी निघून आले माहितेय, पुरी पिक्चरमे एक भी इमोशनल सीन नही……….
श्या……….😏
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...