Part II
मम्मीsssss मी नाही शाळेत जाणार ssssss
सकाळी झोपेतून उठल्यावर बाब्याने जोरात आरोळी ठोकली………………
साधारणपणे दहा दिवस डोळ्यातून पाण्याचा एकही थेंब न टपकवता शाळेत बाब्या अगदी सुखासुखी शाळेत जात होता.
एवढ्या सरळसोट पध्दतीने गोष्टी घडून यायची पहिलीच वेळ असल्याने मला आपलं उगाच चुकचुकल्यासारखं वाटत होतं.
आणि शेवटी अकराव्या दिवशी बाब्याचा बांध फुटलाच, शाळेवरचं त्याच प्रेम एकाएकी आटलं आणि झोपेतून उठताक्षणीच त्याने शाळेच्या नावाने नकारघंटा वाजवायला सुरुवात केली.
मी त्याकडे दुर्लक्ष करून त्याला Good morning केले, तर पुन्हा तेच मी नाssही शाळेत जाणार………..
बरं चल, आपण चहा-पाणी घेऊया…….
मी नाsssही शाळेत जाणार……….
(बाब्या देवदास सारखी पोझ घेऊन सोफ्याला टेकून बसला)
अरे तू खेळू शकतोस , इकडे तिकडे उडया मारू शकतोस, असा का बसलायस????
मी नाssssही शाळेत जाणार……….
अरे तुला तर शाळा आवडत होती ना???
( बाब्याने माझ्याकडे बघून , हे तुला कोणत्या गाढवानं सांगितलं वाला लुक दिला )
घे पाणी पी- मी नाsssssही शाळेत जाणार
चल, भातु खाऊया- मी नाssssssही शाळेत जाणार
TV बघतोस का- मी नाsssssssही शाळेत जाणार
अरे !!!!…..कान किटले रे माझे….बस कर आता…..😨
शेवटी त्याची त्यानेच मांडवली केली आणि म्हणाला मम्मी मी आज नाही जाणार, उद्या जाणार उद्या – Promise ☺️
माझही हृदय हेलावलं, म्हटलं बापडा एव्हढा कळवळीने सांगतोय तर ऐकावं त्याचं.
म्हटलं बरं, पण उद्या नक्की जायचं हं. बाब्याने सुटकेचा निःश्वास सोडला, आणि देवदासाचा मुखवटा बाजूला सारून नेहमीचा मर्कटावतार धारण केला.
दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात परत त्याच आरोळीने आणि जब दिल ही तूट गया …… छाप मुखवटयाने सुरू झाली.
मी नाही शाळेत जाणारचं तुणंतुणं नॉनस्टॉप वाजायला लागलं.
मग मीही त्याचा हा इमोशनल अत्याचार आणि हरप्रकारे मला जेरीस आणण्याचा प्रयत्न धुडकावून लावत आणि त्याच्या तीव्र विरोधासकट त्याला शाळेत आणून बसवलच. (जमलं बाबा एकदाचं)
Hmmmmm………
आता बाकी साsssरी पोरं वर्गात settled झालीत, आणि आमचा बाब्या भोंगा वाजवत, हात पाय झाडत, मातीत लोळत शाळेत entry मारतो.
Late current 😏
बाब्या रे बाब्या , एवीतेवी धिंगाणा घालायचाच होता तर दहा दिवस कशाला घेतलेस , ट्रायल घेत होतास का शाळेची ???
कोणाला सुधारायला वेळ दिलेलास???? स्वतःला की शाळेला???
तुझे expectations काही वेगळे होते का रे??? चौकटीत अडकल्यासारखं झालं का तुला????
तू टेंशन नको घेऊ रे, असं कुठेही नाही अडकू देणार आम्ही तुला, दम लागेपर्यंत नाही पळु देणार आम्ही तुला, कुठल्याही ओझ्याखाली नाही दबू देणार आम्ही तुला…………….
तुझं तू फुल, तुझं तू बहर ………….तुला पाहिजे तेवढं, तुला हवं तसं – Promise☺️
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...