मम्मी Santa कधी येणार????
अंधारातून येणार की उन्हातून येणार???
मला काय गिफ्ट आणणार????
मग गिफ्ट कुठे ठेवणार????
मला कसा दिसणार???
गाडी कुठे लावणार ????
गिफ्ट मोठया बॅगेत असणार की छोट्या ??? केवढी मोठी असणार????
मी आज गुड बॉय झालो तर आजच गिफ्ट देणार….??
सगळ्यांना देणार???
ताई ताईला नाही देणार ना????
मम्मी मला हॉकी पोकी (walky talky) द्यायला सांग ना, लाईटवाली गाडी पण सांग, नाहीतर चालणारा रोबोट सांग ना, नाही मम्मी बाईक सांग बाईक पप्पासारखी…….
मैं परेशान परेशान परेशान परेशान……….🙆
माझ्या चिंटूकल्याने गेल्या चार दिवसांपासून नुसतं भंडावून सोडलेलं मला………कधी एकदा तो Santa आजोबा येतोय आणि गिफ्ट देऊन जातोय असं झालेलं मला………एकीकडे किती ती उत्सुकता ओसंडून वाहणारी…….आम्हाला नाकेनऊ करून सोडणारी😇
आणि दुसरीकडे ………
मम्मी Santa binta कोणी नसतं हा……आम्हाला टिचरने सांगितलंय तुमचे मम्मी पप्पाच हळूच गिफ्ट ठेऊन जातात………माझी ठमी मोठ्या टेचात😏
गप ग…….आम्हाला काय पडलंय……😶
नाही मला माहिती आहे… ……मला फसवू नका😚
ठीक आहे पकडून दाखव मग…….🤔
पोरगी गेले दोन वर्ष प्रयत्न करतीये………जमेल तेवढी जाग जाग जागते……..पण लब्बाड Santa
अजून तरी तिच्या हाती लागला नाहीये……😆
हुssर्रेsss
आणि लागणार पण नाही इतक्यात …….
जितकी जमेल तितकी धडपड करेल तो तिला अजून लहानच ठेवायला, असं सगळं कळतं म्हटलं की जीवाला लागतं त्याच्या पण……..झटकन पोर मोठी झाल्याचा फील येतो ……. नकोसा वाटतो अगदी…….
त्यापेक्षा परेशान आत्मा परवडला……… पाहिजे तेवढं छळा, हैराण करा……..पण आम्हाला सगळं कळतं म्हणू नका…….तुम्हाला त्या गिफ्ट देणाऱ्या Santa ची शपथ……….एवढ्या हौसेने येणाऱ्या त्याचा पचका करू नका😉
उलट कितीही मोठे झालात तरी म्हणा …….
You are always welcome santa🎅
खूप छान वाटेल त्याला😄
खरंच
खूप खूप छान वाटेल त्याला😄😄
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...