मम्मीss तू मला काय खायला पण देत नाही हा 🙄
डायलॉग डिलिव्हरी बाय माझा पिटुकला…….👦
वेळ: रात्रौ 11.45 च्या आगेमागे
मला लगेच एखादा साधू कमंडलूतील पाणी माझ्यावर शिंपडून “माता न तू वैरीणी” असं क्रोधीतपणे बोलून काहीतरी शाप देतोय असा भास झाला.😱
काsssय मी तुला खायला देत नाही……
चांगलं जेवून झालय…दूध पण ढोसून झालय…..वेळ काळ आहे की नाही???
नाही मला भूक लागली, खायला दे….😣
गप झोप मुकाट्याने……😠
नाही……खाल्याशिवाय मी काय झोपणार नाही🤡
ठीक आहे मग मी झोपते……
भूक लागलीयेsssssss😭😭😭😭😭😭
कसला इमोशनल ड्रामा आहे 😡
काय दयायचं आता या वेळेला😠
काहीही दे😬
घे खा बाबा …..आता तरी झोपशील???
आणखी पाहिजे😫
काय टाईमपास आहे……झोपतो का😏
शेवटचं दे मग झोपींन…
नक्की ना????
हो😄
खाण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर
लाईट बंद करायला उठावं तर…….
मला ती बंदूक घेऊन झोपायचंय 🔫
कुठली रे बाबा🤔
ती यल्लो वाली छोटी जत्रेतून आणलेली
हे बघ ती ब्लू दिसतेय समोर ती देऊ का
नाही येल्लो वालीच पाहिजे😫
काय छळ आहे यारssss🤷
बंदूक दिल्याशिवाय मी काय झोपणार नाही🤡
नेमकं जे हवं असत ते कधी टाइमावर मिळेल तर शप्पथ😨
चला शोधा …….😵
पप्पा, मम्मी , ताई बंदूक शोधण्याच्या मोहिमेवर
कपाटाखाली…..नाही 🤙
बेडखाली बघा रे……नाही 🤙
काढा काढा तो खेळण्याचा कप्पा बाहेर काढा 😡😡
बघा दिसतेय का द्या एकदाची आणि झोपवा त्याला
ह्या… नाहीच कुठे🙆
ही बघ ही मोठी आहे, wowww कसली भारी दिसतेय ही चालेल???
नाहीsssss मला येल्लोवली छोटीच पाहिजे😫
शी बाबा काय वैताग आहे…..😱
त्याला काय टाईमपास नाही, लावलंय घरादाराला धक्क्याला….
अर्धा तास सारं घर धुंडाळून झाल्यावर
हे बघ मम्मी इथं फ्रिजच्या मागे पडलीये…..माझी लाडकी😍
हुश्शsssss
काय करू ग तुझं कुठं ठेऊ तुला…..😘😘😘😘
जग जिंकल्याचा आनंद आम्हा तिघांना…..
याहू ssss आता तरी झोपायला मिळेल 😴
पोरगं उशाशी बंदूक ठेऊन आता काय करावं या पेचात
आणि मी देवा कृपा कर रे झोपायची बुद्धी दे याला……🙏
चल मी लाईट बंद करते आता…..
अय्या मम्मी👧
तुझं काय आता🙃
उदया पासपोर्ट साईझ फोटो मागितलाय माझा
आत्ता आठवतंय तुला😣
राहू दे ….परवा दे आता
नाही उद्याच द्यायचाय केव्हाच सांगितलं होतं
अगं, आत्ताच मी गुणवंती म्हटलं होत ना ग तुला
एवढया पट्कन गुण उधळलेस😡
तुमची पार्टी काय सुधारत नसते- नवरोबा उवाच😯
घे या टमक्यांना तुझ्या पार्टीत आणि बस सुधारत😠
Goodnight all, enjoyyyy नवरोबा😴😴😴
जावा ताईसाहेब शोधा….. नेहमीच्या ठिकाणी बघा आहे का😟
मम्मी मी पण शोधू , पिटुकला उत्साहात🤗
नको तुम्ही झोपायचे उपकार करा😞
नाहीये ग
त्या ड्रॉवर मध्ये बघ
मिळाला मिळाला😃
झोपा मग😡
शेवटी एकदाचे दिवे बंद…….🙅
हा मम्मी गोष्ट सांग- अर्थातच पिटुकला👦
आहेच का अजून🙃
टोपीवाला आणि माकडं….. झाली
उंदीर मामाची डुम डुम डुमाकवाली…… संपली
आणखी सांग…..
अरे झोप की लेकाच्या…..👊
गोष्ट सांग …..
माझी आणि ताईची सांग (उफ्ss, आता अशी स्वतः गोष्ट तयार करून सांगताना मला स्वतःला अति प्रमाणात गुंगी येते….)
मी गुंगत…….मग ताई आणि तू दोघं…..उंदीर मामा….
झुकझुक……कावळा …….बागेच्या मध्ये….. पुण्याला …..वडापाव
मम्मी, तू काय पण बोलतेस
ए मम्मी ssss मम्मी😴😴😴😴😴😴
काय रेsssss
नीट गोष्ट सांग ना….तू मधेच थांबतेस हा
मला खरं तर टारझन सारख ओरडावं वाटत होतं
ओssssssssssssssआssssssss
आता बस्सss😡😡😡😡😡
खूप झालं…..झोप मुकाट्याने……मला काही बोलवत नाहीये……काही म्हणजे काही सुचत नाहीये ……
तुला झोपायचं तर झोप मी झोपलेssss
पोरगा माझ्यावर रागवून मुसमुसत खुसपुसत एsकsदाsचा झोssप ssतो ✌️✌️✌️
तर ही होती झलक एका रात्रीची…….
अशा अनेक रात्री माझ्या पालकत्वाच्या प्रवासाच्या साक्षीदार आहेत…….
कधी या रात्रींनी खूप खूप हसवलय……कधी रडवलय……तर कधी अगदी वैतागून सोडलंय……..
माझी मुलगी अगदी लहान असताना दिवसभर डाराडूर असायची…….आणि रात्रभर मग लगातार शी-शु चे प्रोग्रॅम करत टकाटक जागी राहायची.
वर्ष लागलं उलट्याचं सुलटं व्हायला….
पोराने तर रात्री आणि दिवसाही जागायचा उच्छादच मांडला…..दहा दहा मिनिटाच्या nap काढून बाजीराव आम्हाला तालावर नाचवायला मोकळे व्हायचे……..
आणि आता तर मला झोपायचंच नाही असं तो जाहीर करतो……बहाणे शोधतो ……त्याला झोपेसाठी आडवं पाडणं हाच एक मोठा टास्क असतो दररोजचा.
बिचाऱ्याला सतत कार्यरत राहायला आवडतं आणि आम्ही मात्र, तुझ्याबरोबर आमच्याही देहाला विश्रांतीची गरज आहे रे अशी आर्जव करून करून त्याच्यातल्या हिरिरिच्या कार्यकर्त्याला दाबू पाहतो……..काय करणार🙆
रोज रात्री नवीन एपिसोड, नवीन नौटंकी…..
कॉमेडी, ऍक्शन, इमोशनल से खचाखच भरा ड्रामा हर रात, माझ्या घरात😇
आपके घरका पिक्चर कैसा है रे बाबा 🤓
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...
Kahani ghar ghar ki…. Bahot badiya