काल रात्री बरोबर 12 वाजता आमच्या दाराची बेल वाजली. आमच्या साऱ्यांचे कुतूहल जागे झाले, आता कोण आलं बरं????😳
दोन्ही पोरांनी खेळ सोडला आणि पळत पळत बघायला आली……मी हातातलं काम सोडलं आणि बघायला आले……
नवऱ्याने पटकन जाऊन उत्सुकतेने दार उघडलं तर कोssssण???🤔
कोणीच नाही…….🙆
सगळीकडे बघितलं कोण लपलयं का???
नाही कोणीच नाही🙆
बेल वाजवून आमचं कुतूहल जागं करून कोणीतरी क्षणात पसार झालं…..
किती आनंद मिळाला त्याला आम्हाला उल्लू बनवण्यात …….😀
आणि खोटं कुठेय बनलोच आम्हीही उल्लू…….त्या बेलने किती एक्साईट केलं आम्हाला ……
सारं काम सोडून तिच्या मागे लागलो आम्ही……
मुलांना वाटलं आजोबा आले, मला वाटलं गावचा कोणी पाहुणा आला, नवऱ्याला वाटलं कोणी मित्र आला……..
या वेळी कोणीही येण्यासारखं नव्हतं तरीही आमच्या आशा जागृत झाल्या त्या एका टिंग टॉंगने…..
खोडसळपणाचा राग यायला हवा होता खरं तर पण कुठल्या तोंडाने रागावणार………
लहानपणी हा आम्हा मैत्रिणींचा आवडत खेळ होता, भर दुपारी आम्ही लोकांच्या घरांच्या कड्या वाजवत फिरायचो, आमच्या बिल्डिंग मधल्या लोकांच्या पण आणि जिथे क्लासला जायचो तिथल्या पण……
शेवटी अति झालं आणि लोकांच्या क्लास टिचरकडे येणाऱ्या वाढत्या तक्रारींनी आम्हाला मग कायमचं शांत केलं.
मला तर वाटतं हा साऱ्या पोरांचा सर्वात आवडता खेळ असावा…….कडी वाजवणं आणि धूम ठोकून पळून जाणं. हो की नाही????
आणि हा पराक्रम न करणारा या भूतलावरच कोणी नसेल😎
किती उकळ्या फुटायच्या चोरून बघताना, त्या घरातल्या बापड्याने किंवा बापडीने दरवाजा उघडल्यावर ………!!!
आता आमच्याही दरवाजाची बेल बरेचदा वेळी अवेळी आणि बरेचदा मी सुखनिद्रेत असताना वाजवली जाते.
मी केकाटायला सुरुवात करायला लागले तर माझं अंतर्मन माझा धिक्कार करू लागतं, कुठल्या तोंडानं बोलते ग तू…….बस गप🙃
म्हणतात ते काही खोटे नाही; सारा किया कराया यहीपे भुगतना पडता है……..
चुन चुन के बदला लिया जायेगा…….भगवान के घर मे देर है लेकिन अंधेर नही प्यारे😊
माझं भूगतनं तर सुरू झालय…..तुम्ही त्यातले असाल तर तुम्ही पण सुटणार नाय हा😲
Goodluck😆
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...