ए उदया मी नाही येणार बरं का, रजा टाकलीये मी उद्याची, लंचमध्ये भारतीताई आपल्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना अगदी उत्साहाने म्हणाल्या.
त्यावर त्यातली एक मैत्रीण म्हणाली, का ग एवढं आहे तरी काय उद्या?
उद्या ना माझ्या सुनेचा वाढदिवस आहे मैत्रिणींनो……..
सुनेचा वाढदिवस? आणि तू एवढी हौसेने बोलतेयस, दुसरी एक मैत्रीण जरा मोठ्यानेच म्हणाली, तशा बाकी सर्वांच्या पण भुवया उंचावल्या गेल्या.
का? त्यात काय? लग्नानंतरचा आमच्या घरातला तिचा पहिला वाढदिवस आहे. मला तर कुठलातरी सणच असल्यासारखं वाटतय.
मस्तपैकी सेलिब्रेट करणार आहे मी!!
भारती, तुझं सगळं पटतं तुझ्या सुनेशी? असेलच, म्हणूनच इतकी नाचतीयेस, आणखी एक मैत्रीण कुत्सितपणे म्हणाली.
अगं, तसं तर काही गोष्टीत आपल्या मुलांशी तरी कुठे पटतं आपलं? रागावलो, रुसलो तरी नॉर्मल होतोच ना परत?
कारण आपलेच असतात ना ते? तसच एकदा सुनेलाही आपलं मानलं की झालं. मी तर बाई तिला माझी दुसरी मुलगीच समजते. माझी मुलगी सांगत असते ना एकेक तिच्या सासुबद्दल! मग मुलीचं मन समजून घेता घेता सुनेचही मन समजायचा प्रयत्न चालू असतो मनात. माझ्या मुलीला जे अपेक्षित असतं सासुकडून तेच माझ्या सुनेलाही असणार ना?
तरीही मुलगी ती मुलगीच आणि सून ती सूनच, तिला आई वडीलच जवळचे, तू कितीही माया लावलीस तरी. हे लक्षात ठेव भारती. तेव्हा उगाच जीव अडकवू नकोस, पस्तावशील नंतर; हे तसं बोलायला बोलली एक, पण भारतीताईंच्या सगळ्या मैत्रिणींच हेच मत होतं.
असेना का, आणि असणारच. कोणत्या मुलीला नसतात सांगा आई-वडील जवळचे? त्यांची जागा वेगळीच. ती मला घ्यायचीही नाही.
मी तिच्याकडून काहीही अपेक्षा न करता जीव लावतीये, मग पस्तावेन कशी? आपल्या मुलांना भरभरून प्रेम करताना काय आपण अपेक्षा ठेवतो, त्यांनीही आपल्यावर तितकंच प्रेम करावं?
मॉडर्न सासू बनण्याच्या नादात हसं करून घेऊ नको म्हणजे झालं. काय ग मैत्रिणींनो पटतंय का तुम्हाला हिचं हे सुनेच्या वाढदिवसासाठी एवढं एक्साईटेड होणं?, पुन्हा एक पचकलीच.
अगं त्यांना काय विचारतेयस, त्या तुझ्यासारख्याच. वर्षानुवर्षं चालत आलेल्या परंपरा जपणाऱ्या. सुनेकडे परक्याची लेक म्हणून बघणाऱ्या. कोणी काही वेगळ्या वाटेने जायचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा, होईल तेव्हढं मागे खेचायचा प्रयत्न करणाऱ्या.
पुढच्या वर्षी तर मी माझ्या सुनेचा वाढदिवस आणखी दणक्यात साजरा करेन आणि आवर्जून तुम्हालाही बोलवेन, मग ठरवा तुमचं तुम्हीच; जुन्या विचारांत अडकून बसणं, की काळाची पाऊलं ओळखून पुढे जाणं, काय जास्त आनंददायक आहे!!

लंच संपला तसा तो विषयही तिथेच संपला. तिथल्या फारश्या कुणाला इंटरेस्टही नव्हता त्यामध्ये. पण भारतीताईंना मात्र कधी एकदा ऑफिस सुटतंय असं झालं होतं. त्याच्या मनात सगळी जुळवाजुळव चाललेली, कसं करायचं अन् काय करायचं याची. चित्त सगळं सुनेपाशीच होतं त्यांचं. तिच्यासाठी सुंदरसा ड्रेस ऑनलाइन मागवून ठेवला होता त्यांनी. तिच्या आवडीचे पदार्थ त्या खास स्वतः बनवणार होत्या. सगळं सगळं डोळ्यासमोर दिसत होतं त्यांना.
ऑफिस सुटलं तसं त्या गडबडीने निघून घरी पोचल्याही. पण घरी मात्र त्यांना वेगळंच पाहायला मिळालं.
नेहमी त्या पहिले घरी येत, मग त्यांच्यामागे मुलगा यायचा कामावरून. सुनेला वर्क फ्रॉम होम अलाऊड होतं. भारतीताईंनी लॅचच्या चावीने दरवाजा उघडला तर आज मुलगा घरात समोरच दिसला. त्यांची मुलगीही आलेली दिसली. एका सेकंदासाठी काळजात धस्स् झालं त्यांच्या. पण दुसऱ्या सेकंदाला सगळे हसत हॅपी बर्थडे टू यू करत टाळ्या वाजवायला लागले, आणि भारतीताईंच्या लक्षात आलं. अरे, हो की आज माझा वाढदिवस. मी विसरलेच!!
त्यांची लाडकी सून पुढे येऊन त्यांना मिठी मारून म्हणाली, आई तुम्ही कितीतरी दिवस अगोदर पासून माझ्या वाढदिवसासाठी इतक्या एक्साइटेड होता, आम्हाला तर फुल गॅरेंटी होती, आणि घडलंही तसच!! माझ्या वाढदिवसाच्या नादात तुम्ही तुमचा वाढदिवस मात्र चक्क विसरलात!!
मग मी सुद्धा ठरवलं, आपणही सरप्राईज देऊया. सर्व नातेवाईकांना फोन करून सांगितलं, ज्यांना फोन करायचेत त्यांनी रात्री करा. कोणीही आठवण करून देऊ नका.
ताईला लवकर बोलावून घेतलं. आम्ही दोघींनी मिळून तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा सगळा स्वैपाक करून ठेवलाय. तो बघा तुमच्या आवडीच्या फ्लेवरचा केक वाट बघतोय केव्हापासून तुमची!!
आणि हे तुमचं गिफ्ट!! असं म्हणत सुंदरशी साडी तिने भारतीताईंच्या हातात दिली, आणि म्हणाली, पटकन फ्रेश होऊन नेसून या हिच. मग मस्त सेलिब्रेट करू आपण.