आपल्या ब्लॉग चे नाव ”हल्ला गुल्ला” असं ठेवणार आहे , हे माझ्या मुलीला सांगितलं तेव्हा ती शांतपणे अभ्यास करत होती; निदान मला तसे भासवत तरी होती; पण जसं मी तिला नाव सांगितलं तशी ती चटकन उठली, तिने पटकन अभ्यासाच्या नावाखाली मांडलेला पसारा उचलला, आणि ती मोठमोठ्याने गाणी लावून नाचायला लागली…….वरून या कृत्यात चिंटूकल्यालाही सामील करून घेतलं.
आणि माझ्याकडे बघून ओरडली…………….
मम्मी नाचो ssssssssssssss
एवढं लेकीचं फर्मान सुटल्यावर मम्मी कसली थांबतीये, ती पण सुटली आणि सुरू झाला , हल्ला गुल्ला ssss हल्ला गुल्ला……….
त्यातच आमच्या छोट्या मंक्याच्या अंगात अतिउत्साह शिरला, त्याने सरळ सोफ्यावरून उडी ठोकली आणि स्वतःचं………………?????????????????
काहीही फोडून घेतलं नाही (देवा पावलास रे 🙏)
उलट आम्ही काळजीने ओरडल्यामुळे आमच्याशी कट्टी फू करून बसला.
या धाबडधिंग्यात आम्ही दोघी एकमेकींच्या पायात पाय अडकून पडलो आणि माझी कंबर ………..???????
लचकता लचकता राहिली (आतातर खरंच पावलास🙏🙏)
तरीही आमचा उत्साह काही मावळेना, अखेर पोटातल्या कावळ्यांनी फारच भणाणून सोडल्यामुळे त्यांना शांत करणे भाग पडले आणि झटपट होणाऱ्या खिचडीवर यथेच्छ ताव मारला गेला.
थोडक्यात आमच्या ब्लॉगचं बारसं आम्ही भरभरून एन्जॉय केलं !!! ( ते आपलं एक निम्मित!!! माकडसारख्या उडया मारायची हौसच दांडगी🙃)
त्या उत्साहवर्धक कालावधीत आम्ही प्रॉप्स म्हणून ज्या ज्या गोष्टींचा वापर केला; खेळणी, उश्या ,चादरी, ओढण्या, गॉगल्स आणखी काय न काय……….. त्यांचा नुसता चहूकडे बाजार भरला होता, जणू काही त्या आम्हाला विचारत होत्या; झाला का झाला जीव शांत?????
मला तर ते बघुनच गरगरायला लागलं, पोरगी क्लासच्या नावाने पळाली, पोरगा कधी नव्हे तो गुडुsक करून झोपून गेला. ह्याला रोज नाचवला पाहिजे असा , उगाच निद्रानाश झाल्यासारखा फिरत असतो बघावं तेव्हा😏
अब बाकी बचे मै और मेरी तनहाई……..
और ये घरभर पडा पसारा………..
चल सुरू हो जा पठ्ठी …………
मग काय ……….पठ्ठी तिच्या आवडत्या गाण्यावर ताल धरत धक्क्याला लागली 🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
चाहें कुछ भी हो, सदा मुस्कुरायें
दिल मे उमंगे हो, और मस्ती मे हम नाचे गाये
गुल्ला गुल्लाssss हल्ला गुल्ला
गुल्ला गुल्लाssss हल्ला गुल्ला