बोले तो आज आपुनका दिन है, महिला दिन….
क्या???? एकदम चुपचाप जाके कोपचे मे बैठनेका……ज्यादा आवाज करनेका नही…….खाली आपुन बोलगा ….और आपुन बोलतेही रहेगा
महिला का दिन जी भरके साजरा करेगा….. 💃💃
कसलं भारी स्वप्न होतं ….. नवऱ्याला ठसन देताना फिलिंग एकदम हवेतच ……!!!
कशाला मेला तो गजर वाजला नको तेव्हा….
खरंतर शाळेला सुट्टी द्यायला हवी महिला दिनाची!!!
सकाळ सकाळ धक्क्याला लावतात…..
तरी मी नवऱ्याला लिस्ट दिली होती , आमच्या (माझ्या आणि मुलीच्या) सन्मानाप्रित्यर्थ काय काय करायचं त्याची……!!!!
आणि तिच लिस्ट डोक्याशी ठेऊन हा चक्क घोरतोय…..पोरीला उठून आवर म्हटलं तर म्हणतोय …..तेवढं मॅनेज कर ना बाकी मी सगळं बघतोच…..डोळे पण उघडवत नाहीत ग😔
पहिल्याच कामावर फुली मारली टमक्याने….
हाय रे मेरा महिला दिन🤦
अगं किती वेळ लावतेस???? चहा कुठाय ? नाष्टा कुठाय?? डबा तर नसेलच ??? नेहमीचंच आहे तुझं
By the way……हे सगळं तर तू आज स्वतःच करणार होतास…..त्याशिवाय माझ्याशी अत्यंत अदबीने बोलण्याचा ठराव सुद्धा मंजूर केला होतास😠
ऑफिसला दांडी मारून माझा शब्द न शब्द झेलणार होतास😠
पूर्ण दिवस छोट्या मंक्याचे कंत्राट घेणार होतास 😠
पोरीचे पेंडिंग प्रोजेक्टस पूर्ण करणार होतास😠
तुझ्याहस्ते घरात काही गोडधोड करणार होतास😠
काल मार झोकात म्हणाला होतास…..उद्या तुला फिलिंग हेवनच करतो की नाही बघ👿👿👿👿👿
Wht happened to all that????
क्या हुआ 📣 तेरा वादा…….वो कसम वो इरादा😏
हो हो बेसूर आळवू नकोस …..पुढच्या महिला दिनाला नक्की म्हंजे नक्की….तुझी शप्पथ 😘 (हूं …ठेव तुझ्याकडेच)
आता मला उशीर होतोय, अतिशय महत्वाच काम पेंडिंग आहे, सकाळीच लक्ष्यात आलं माझ्या, पळतो मी चल बाय…..
आणि हो राहिलंच, हॅपी महिला दिन हा ✌️
बाय बाय… Enjoyyyyy your day……..
गेला …..माझ्या हातावर तुरी देऊन पळाला🤙
दगाबाज रे ……..💔💔💔
🙄 बोले तो ….आपुन के महिला दिन साजरा करनेकी तो वाट लग गयी ना मामु🙆🙆🙆
फिलिंग : पोपट