माझ्या जीवश्च कंठश्च मैत्रीणेsssss,
अगं आहेस तरी कुठे???? कित्ती दिवस झाले भेटलो पण नाही आपण?? गेले कित्येक दिवस फक्त प्लॅंनिंगच चाललंय भेटायचं, किती गोष्टी साठून राहिल्यात मनात, कधी एकदा तुला पकवून मोकळी होतेय असं झालंय मला, आणि खरंतर तुझ्याही दिलाचा मौहोल तोच असणारे forsure……
बघ, आता तर तो frienship day पण येऊन ठेपला!!! सेलिब्रेशनसाठी आपण भेटायचं नक्कीच आहे, पण आज नाही, येत्या वीक मध्ये ऑड डे ला !!!
काsss करून केकाटू नकोस लगेच , कळेलच ते तुला आणि आवडेलही नक्कीच😊
For a change नवरा, सासू, पोरं- बाळ, ऑफिस यांच्या नावाने ट्याsव ट्याsव नाही करायचय यावेळी.
त्यांच्या तक्रारी ही नकोत आणि कौतुकं ही नकोत. कॉलेज मध्ये असताना कुठे होते ग हे सगळे, आता आपले मिनीटा-मिनीटाला हे सारे मध्ये मध्ये आहेतच, (यांचा उदो उदो करता करता) आपण स्वतःलाच विसरलोय अगदी. 😏
म्हणूनच यावेळस सर्वाना टुल्ली देऊन, इतक्या वर्षाची आपली मैत्री आपण मस्त साजरी करायची.
पिक्चर नाही बघायचा की हॉटेलमध्येही नाही जायचं, शॉपिंगही नाही करायची की नेहमीसारखं भाजी मार्केट मधेही नाही घुसायचं.
आपण जायचं आपल्या कॉलेजला, अकरावीत जिथे आपण भेटलो, येता जाता सोबत करता करता आपल्याच नकळत आपली मैत्री बहरली, त्याच वाटेने मस्त धमाल हुंदडायच. अगदी पहिल्यासारखं……..
बस स्टॉपवरच भेटूया आपण पूर्वीसारखं, त्यावेळी कसं कॉलेजला जाताना घाईघाईत धापा टाकत शेवटच्या घंटेच्या टोल्यावर पोचायचो, तसच जाऊया आताही धावत पळत (फिलिंग नको का यायला???).
निवांत बसूया कॉलेजच्या कट्ट्यावर, आपले जुने मित्र मैत्रिणी, त्यांच्याबरोवर केलेल्या उनाडक्या, तत्कालीन लैला मजनूचे फेमस किस्से, बेंचवर एकत्र बसण्यासाठी केलेली धडपड, boaring लेक्चरला गुपचूप खेळलेले गेम, पिकनिकची मस्ती, अजूनही निघतील खूप साऱ्या गमती ; भरभरून बोलूया सगळ्यावर.
डोळे भरून पाहूया तो आवार, बघूया काही खाणाखुणा सापडतात का तिथे आपल्या वावराच्या (बेंचवर नक्कीच😆). खाऊया तो कॅन्टीन मधला वडापाव, पोह्याचा समोसा, बघूया जुनीच टेस्ट टिकवून ठेवलीय का त्यांनी आपल्यासारखी अजूनही.
जाऊया जरा त्या टीनेजर्सच्या घोळक्यात, घेऊया त्यांची हवा अंगात संचारून……….उडूया त्यांच्याबरोबर आपणही पूर्वीसारखं.
न्याहळत बसुया त्यांचे भिरभिरणारे डोळे आणि फुलपाखरी मन, आठवतात का बघूया आपल्यालाही आपले विसरून गेलेले हळुवार क्षण!!!
आपणही होतोच की कधीतरी त्यांच्यातल्याच; स्वप्नाळू नजर घेऊन तुझा सल्लू आणि माझा शाहरुख शोधत बसणाऱ्या. 😍
थोडंस मागे जाऊन आठवूया कॉलेजमधला आपला पहिला friend ship day……
कित्ती कित्ती खुणा मिरवत होतो नाही आपणसुद्धा हातावर नवनवीन मैत्रीच्या, तेव्हा माहीत तरी होत का ग यातल्याच एका खुणेत आपल्याला जन्मभराचं मैत्र गवसणार आहे.
खरचं एक दिवस देऊया या साऱ्याची उजळणी करायला, ते मैत्र फुलतानाचे क्षण पुन्हा एकदा जगायला……..!!!!
ठरलं का मग ????
आणि हो राहिलच की, परत येताना तो एक रुपयेवाला जाडा पेप्सी कोला (आता दोन रुपयेला झाला म्हणे), तुला खारे शेंगदाणे आणि मला चणे नक्की घेऊया हां……..
येशील ना मग………????
एssss, क्या बोलती तू????
©स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेन्ट, फॉलो नक्की करा. शेअर करायचा असल्यास नावासकटच होऊ द्या😊
मी आणि माझी जिवलग मैत्रीण विशाखा २४ वर्षांपूर्वी👇
आताच्या आम्ही दोघी आणि आमच्या मुली, आमच्यासारख्याच त्याही गाढ मैत्रीच्या वाटेवर👇