TV वर ‘मैने प्यार किया’ मधलं आया मौसम दो ss सती का गाणं सुरू झालं, त्यात त्या प्रेमची सुमन सायकल वरून पडते, असा सीन आला आणि मी एकदम उत्साहात ओरडून माझ्या पोरीला सांगितलं, हाsss बघ हाsss ड्रेस होता माझ्याकडे same to same………तिने आपलं तोंड देखलं wowwwww करून सोडून दिलं.😏
मी मात्र त्या निमित्ताने सुमनच्या सायकलवरून माझ्या आठवणींच्या वाटेवर मस्त रपेट मारून आले………..
पिक्चर मधल्या हिरो-हिरोईनींसारखं टिपटॉप दिसावं असं कोणाला वाटत नाही सांगा बरं???
मला तर फारच वाटायचं, बघेन त्या पिक्चरची हिरॉईन अंगात घुसायची आणि घरच्यांचा जोरदार धपाटा खाल्ल्यावरच बाहेर पडायची……..
ही सुरुवात MPK पासूनच झालेली मला आठवतेय;
त्यावेळी माझ्यासारख्याच अनेक सुमन फिरताना दिसायच्या…… कोणी तो व्हाईट ऍण्ड ब्लू डॉटेड ड्रेस घालून(सायकल वाला) , कोणी कबुतर जा जा वाला पांढरा पंजाबी ड्रेस घालून, कोणी पटोला ओढणीवाला हिरवा, लाल ड्रेस घालून……….
मी सुद्धा माझा डॉटेड व्हाईट टॉप आणि ब्लू स्कर्ट
घालून आणि त्यावर तिच्याच सारख्या दोन वेण्या घालून प्रतिसुमन फील करायचे स्वतःला………..
अंगात आपोआप तिचे अविर्भाव यायचे आणि दोस्ती की है……. निभानी तो पडेगी हा डायलॉग दिसेल त्या मैत्रिणीला (एवढंच ऑप्शन होतं) चिपकवायचे (शक्य तितका लाडिक आवाज काढत)
सुमनप्रमाणेच ती FRiEND असं लिहिलेली टोपी घालून प्रेमचे बरेच अवतार पण फिरत होते आजूबाजूला……..(माझ्या नव्हे……मी तेव्हा छोटीशी सुमन होते😊)
मग आली ‘चांदनी’ पिक्चर मधली सप्तरंगी ओढणी……..पांढरा पंजाबी ड्रेस घालून केस मोकळे सोडून चांदनी बनून फिरायचं…….असं स्वप्न होत माझं; पण ती ओढणी कोणी घेऊनच दिली नाही………..दहा गोष्टी मागितल्यावर कशीबशी एखादी गोष्ट मिळायचे दिवस होते ते……….
मग आल्या त्या ‘आशिकी’ पिक्चर मधल्या जाळीवाल्या आणि त्यावर स्टार असणाऱ्या रिबीनी……आणि मुलांसाठी आला राहुल रॉय कट………..
मग काय रिबीनी बांधून पोरी फिलिंग अनु आणि कट मारून पोर फिलिंग राहुल……बॅकग्राऊंडला मनात बस एक सनम चाहीयेssss आशिकी के लिये 🎻🎶🎶
मला खरं तर ती अनु अग्रवाल काय एवढी आवडत नव्हती, रिबीनी बांधल्यावर उगाच मख्खासारखा चेहरा करून वावरायला लागायचं 😯(नको तिची पण स्टाईल मारायची हुक्की)
मग आला रघु ……..’दिल है के मानता नही’ मधल्या टोपीची हवा घेऊन………
आमची माधुरी तर एक दो तीन करत आलीच होती तिचा तो फेमस MD कट घेऊन …………
खरंतर तो कट करून मै भी माधुरी दीक्षित बनाना चाहती थी मगर…… उंदराने कुरतडलेल्या केसांच्या दोन वेण्या येणार नाहीत असं दटावून त्यावर पाणी फेरलं गेलं. 😭
मुलींना केस कापावेसे वाटू लागले अन मुलांना वाढवावेसे, कधी ते केस मानेवर रूळवायचे तर कधी चक्क पोनी घालून मिरवायचे………
संजय दत्त, सलमान,अक्षय, सुनील शेट्टी यांचं वार लागलेलं त्यांना………
‘बाजीगर’ वाल्या शाहरुखने तर चष्मा सुद्धा स्टाईलीत आणला होता……त्याचे ते कपाळ झाकणारे केस आणि त्यावर तो मोठ्या फ्रेमचा चष्मा, आठवतोय का???? चष्मा न लागलेली पोरं पण तो चष्मा लावून शाईनिंग मारत फिरायची………🤓
माझ्या नवऱ्याला ना, तो डर पिक्चर मधला ‘ तू मेरे सामने ‘ गाण्यातला शाहरुखचा शर्ट खूपच आवडायचा, तो त्याला नाही मिळाला तेव्हा , ते गाणं लागलं कधी तर; एक ना एक दिन मैं ऐसी शर्ट पेहनकेही रहूँगा, असा डायलॉग प्रत्येकवेळी न विसरता मारतोच…………(खुश्शाल घाल आणि फिरायला कोण आहे तुझ्याबरोबर मी आणि आपली चिल्लीपिल्लीच)
पोरांच्या स्टाइलींची गोष्ट निघाल्यावर Baggy pants ला विसरून कसं चालेल……..आता परफेक्ट फिटिंगच्या जमान्यात त्या Baggy pants चा विचार करता हसू आवरत नाही…….पण हिरोंपासून सामान्यांपर्यंत सर्वाना तिने झपाटून सोडलं होतं.
जो तो त्या अघळपघळ Baggy मधेच स्वतःला फिट करू पाहत होता……….
तसंच त्यावेळी फुग्याच्या हातांनी एक वेड लावलेलं आम्हा मुलींना आणि बायकांना सुद्धा…….. कुठलाही ड्रेस असो वा ब्लाऊज फुग्याच्या बाह्या मस्ट म्हंजे मस्टच होत्या त्यावेळी……..कृष्णधवल सिनेमांमधल्या हिरॉइनींच्या स्टाईलचं धडाक्यात पुनरागमन होत ते………
त्यानंतर तो प्लेन घोळदार स्कर्ट आणि त्यावर प्रिंटेड टॉप (शरारा स्टाईल ) जवळपास प्रत्येक मुलीकडे असायचाच. कोकिळेसारखं बोलणं आणि भोळा भाबडा चेहरा असणाऱ्या ‘बेटा’ मधल्या सरस्वतीने घातलेला ना साधारण तस्साच🤣
‘हम आपके है कौन’ मधल्या मौसम का जादू वाल्या गाण्यातला लाल ड्रेस प्रत्यक्षात नाही मिळाला कधी पण स्वप्नात मात्र मला मी फक्त त्याच ड्रेसमध्ये दिसायचे त्या काळी, निशाच्या देवर दिवानाची साडी तर जबरी होतीच पण पूजा वहिनींच्या ‘लो चली मै’ वाल्या ऑरेंज कलरच्या साडीने मार्केट खाऊन टाकलं होतं……….कसला डिमांड मधे आलेला ऑरेंज कलर……
दहावीच्या निरोप समारंभाला माझ्याबरोबर बऱ्याच ललना ऑरेंज साडीमध्येच मुरकत होत्या………साडी रेणुकाची आणि अदा माधुरीची …………आssहाss
चला………..रपेट संपली आता…….
यानंतर आमचं पाऊल कॉलेज मधे पडलं आणि चालू ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा थोडं हटके दिसावं असं वाटू लागलं …………
आणि स्टाईली तरी कुठे राहिलेल्या कॉपी करण्यासारख्या रंग रंग रंगीला वाल्या उर्मिलाचा बिनधास्त कपडे छाट ट्रेंड सुरू झाला होता………..तो आमच्यासारख्या सामान्यांना झेपतोय थोडाच!!!🙃
काय मग ??????
तुम्ही पण छाप मारून घेतला होता का कोणाचा, तुम्हालाही माराव्याशा वाटल्या होत्या का स्टाईली कधी???
का तुम्ही त्या गावचेच नव्हता 😜😜😜
आणि घरी पण विचारा की जरा आपल्या
आजी-आजोबांना, आई-वडिलांना कोण कोण देवानंद ,दिलीप कुमार,शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अभिताभ बच्चन आणि मधुबाला, मीनाकुमारी, साधना, हेमामालिनी, रेखा बनून फिरले होते ते!!!
बघा कसे गुलाबी स्वप्नात रमतील लगेच😆
इस्टाईले मारनेका सिलसिला तो भाई अपने पुरखोंसे आज तलक जारी है😝
©स्नेहल अखिला अन्वित
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...